IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी पैशांचा पाऊस पाडला आहे. हा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब झाला असून जीएमपी 44 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ 7 जानेवारी 2025 ला शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
इंडो फार्म इक्विपमेंटच्या आयपीओचा किंमतपट्टा 215 रुपये आहे. जीएमपी 96 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच हा आयपीओ 310 रुपयांना लिस्ट होऊ शकतो.
जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना 44 टक्क्यांनी परतावा मिळू शकतो. रिटेल गुंतवणूकदारांनी हा आयपीओ 101.64 पट सबस्क्राइब केला आहे.
गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 501.65 पट आयपीओ सबस्क्राइब केला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 242.4 पट सबस्क्राइब केला आहे. रिटेल गुंतवणूकदारांना 13 लॉटसाठी बोली लावता आली असती. प्रमोटर्सची भागिदारी आयपीओ लिस्ट झाल्यानंतर 93.45 वरुन 69.44 वर येणार आहे. इंडो फार्म इक्विपमेंटस लिमिटेड या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली होती. कंपनी 16 एचपी ते 110 एचपीच्या रेंजमध्ये ट्रॅक्टर्सची निर्मिती करते. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)