GDP: भारतीय अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय अर्थव्यवस्थेनं आज (19 नोव्हेंबर) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP (Gross domestic product) 4 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहोत. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे.
तर चीन दुसऱ्या स्थानावर असून, जपान तिसऱ्या स्थानावर आहे. तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे.
पुढील चार वर्षांत भारत होणार जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की भारत पुढील चार वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
येत्या काही वर्षात अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
GDP म्हणजे Gross Domestic Product. हे दिलेल्या कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य आहे.
जीडीपी हे देशाच्या आर्थिक आरोग्याचे सर्वसमावेशक स्कोअरकार्ड आहे. ते देशाचा विकास आणि आर्थिक प्रगती ओळखते.
देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी एजन्सीद्वारे सामान्यतः आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून GDP ची गणना केली जाते. खर्च, उत्पादन किंवा उत्पन्न वापरून GDP ची गणना तीन प्रकारे केली जाते.