आयटीआर भरला तरी नोटीस आली? टेन्शन नाही घ्यायचं, फक्त 'हे' करायचं?
आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आयटीआर न भरल्यास तसेच कधीकधी आयटीआर भरूनदेखील अनेकांना प्राप्तिकर विभाग नोटीस पाठवतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यास घाबरून न जाता तुम्ही चार काम करायला हवेत.
सर्वांत पहिलं काम म्हणजे प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. तुम्ही तुमचे उत्पन्न कमी दाखवल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभाग नोटीस पाठू शकतो. आयटीआर भरताना तुम्ही तुमच्या उत्नन्नाचा हिशोब करताना काही चुक केल्यास तुम्हाला आयटीआर विभाग नोटीस पाठवू शकतो.
आयटीआर भरूनदेखील तुम्हाला नोटीस आल्यास ती अगोदर संपूर्णपणे वाचा. त्यानंतर तुम्ही आयटीआरमध्ये काय चूक केली आहे, ते शोधा. तुम्ही भरलेला आयटीआर आमि फॉर्म एस-26 यात काही तफावत नाही ना, याची खात्र करा.
आयटीआर भरताना नेमकी काय अडचण आली आहे, हे समजल्यास नोटिशीला योग्य ते उत्तर देता येते.
नोटिशीचे स्वरुप काय आहे? आलेल्या नोटिशीला कधीपर्यंत उत्तर द्यायचे आहे? हे निट समजून घ्या. सोबतच प्राप्तिकर विभागाने आणखी कोणती कागदपत्रे मागवली आहेत, हे समजून घ्या.
प्राप्तिकर विभागाची नोटीस गंभीर स्वरुपाची असेल आणि तुम्ही या नोटिशीला उत्तर देण्यास सक्षम नसाल तर चार्टर्ड अकाउन्टंटची मदत घ्या.
सीएच्या मदतीने आलेल्या नोटिशीला उत्तर द्या. म्हणजेच भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.
संग्रहित फोटो