Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalbaugcha Raja 2024 Donation : नोटांच्या माळा, दागदागिने... लालबागच्या राजाची पहिल्या दिवशीची दानपेटी उघडली; पहिल्या दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या मंडपात ठेवण्यात आलेली दानपेटी आज उघडण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान अर्पण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल शनिवारी पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सध्या दिवसाचे 24 तास करीरोड, चिंचपोकळी आणि लोअर परेल रेल्वे स्थानक गर्दीने फुललं आहे. या गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात गणरायाच्या दानपेटीत दान अर्पण करतात.
पहिल्या दिवशी प्राप्त झालेल्या दानाची मोजदाद सध्या सुरू आहे. सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदाद केली जात आहे.
रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने या दानपेटीत आहेत.
नोटांच्या माळा यामध्ये आहेत.
लालबागच्या राजाला आलेल्या दानामध्ये फॉरेन करन्सीचा देखील समावेश आहे.
त्यानंतर लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे, त्यांची मोजदाद केली जाणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली रक्कम मोजत आहेत.
पहिल्या दिवशी जमा झालेले हे दागिने आणि रक्कम किती आहे? ते मोजदाद झाल्यानंतरच समजेल.