Recession: सावध ऐका पुढील हाका! अनेक देशांवर मंदीचं संकट, आयएमएफचा इशारा
कोरोना महासाथीच्या काळात अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर अर्थव्यवस्थावर पूर्वपदावर येऊ लागली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता, मात्र चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने मोठा इशारा दिला आहे.
पुढील वर्षी 2023 मध्ये अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा आयएमएफने दिला आहे
2023 मध्ये जगभरातील एक तृतीयांश देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असे आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी म्हटले.
लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई याचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचं प्रमाण आणखी वाढू शकते, असे आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले.
रशियानं युक्रेनवर केलेला हल्ला, तेलाच्या वाढत्या किंमती आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
त्यामुळेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्या तुलनेत लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही. त्यामुळे जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याचे क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले.
वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील सेंट्रल बँकांना आपलं कठोर चलनविषयक धोरण कायम ठेवावं लागणार असल्याचे आयएमएफने म्हटले.
जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेलं हे संकट कायमस्वरुपी नसून अनेक अर्थव्यवस्था यातून बाहेर पडतील, असा विश्वास क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी व्यक्त केला.
image 9
वाढत्या महागाईचा फटका विकसनशील, गरीब देशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.