Vastu Tips : देव्हाऱ्यात चुकूनही ठेवू नका 'या' 5 गोष्टी; आर्थिक अडचणी येतील चालून, आरोग्यावर होईल विपरीत परिणाम
वास्तुशास्त्रानुसार, देवाच्या रुद्र स्वरूपाची मूर्ती घरच्या देव्हाऱ्यात चुकूनही ठेवू नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखराब झालेली, तुटलेली मूर्ती किंवा फोटो देखील देव्हाऱ्यात ठेवू नये, अशा मूर्ती देव्हाऱ्यात ठेवल्याने आर्थिक चणचण वाढते.
तुम्हाला जर शिवलिंग देव्हाऱ्यात ठेवायचं असेल तर ते अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचं असू नये.
देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नये, अन्यथा याचा आरोग्यावर परिणाम होतो.
फाटलेली धार्मिक पुस्तकं देव्हाऱ्यात ठेवल्याने देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे मंदिरात अशी धार्मिक पुस्तकं ठेवू नये.
देव्हाऱ्यात सुकलेली फुलं अजिबात ठेवू नये.
याशिवाय घरातील देव्हाऱ्यात कात्रीसह इतर तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. तीक्ष्ण वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
अनेकांना देव्हाऱ्याच्या वर काही वस्तू ठेवण्याची सवय असते, जसं की, कुंकू, हळद, अगरबत्ती किंवा बंद पणत्या, तर या गोष्टी टाळाव्या. देवाच्या डोक्यावर जास्त गोष्टी ठेवू नये.
घरातील देवांची दररोज न चुकता पूजा करावी, तरच घरात सुखसमृद्धी टिकून राहते.
देव्हाऱ्यावर किंवा देवाच्या फोटोंवर धूळ साचू देऊ नये, ते वारंवार स्वच्छ करावे.