नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या टीप्स, 'अशा' पद्धतीने मिळवा करसवलत; वाचतील हजारो रुपये !
Tax Saving Options: प्रत्येकालाच वाटतं की माझा कर वाचायला हवा. पण प्रत्येकवेळीच हे शक्य नसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण नवे आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करण्याचा विचार केला, तर तुम्हाला अनेक मार्गांनी करात सवलत मिळू शकते.
कर वाचावा म्हणून बँका आपल्या ग्राहकांना टॅक्स सेव्हर एफडीचा पर्याय देतात. अशा प्रकारच्या एफडींचा कालावधी हा पाच वर्षे असतो. या योजनेत ग्राहकांना 7 ते 8 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात. याच योजनेच्या मदतीने प्राप्तिकर कायद्यातील अधिनियम 80सी अंतर्गत तुम्हाला करात 1.50 लाख रुपयांची सुट मिळू शकते.
पीपीएफ योजेवरही सरकार तुम्हाला करसवलत देते. तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला प्राप्तिकर कायद्यातील 80सी अधिनियमाअंतर्गत तुम्हाला वर्षाला 1.50 लाख रुपयाची करसवलत मिळू शकते. ही 15 वर्षांच्या मुदतीची योजना आहे. यात जमा केलेल्या पैशावर तुम्हाला सध्या 7.10 टक्यांचे व्याज मिळत आहे.
ईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) ही योजनादेखील करबचतीसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 3 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर या योजनेच्या मदतीने तुम्हाला करात सवलत मिळते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारण 10 टक्के व्याज दिले जाते.
नॅशनल सेव्हिंग स्कीम (NSC) ही एक पाच वर्षे मुदतीची अल्प बचत योजना आहे. यात गुंतवलेल्या पैशांवर 7.7 टक्क्यांनी व्याज मिळते. तुम्ही या योजनेच्या मदतीने प्राप्तिकर कायद्याच्या 80 सी अधिनियमाअंतर्गत दीड लाख रुपयांची करसवलत मिळू शकते.
तुम्ही तुमच्या मुलाची ट्युशन फी भरत असाल तरी तुम्ही करसवलतीचा लाभ घेऊ शकता.