सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2023-24 या वित्त वर्षासाठी 260 टक्क्यांच्या दराने डिव्हिडेंड जाहीर केला आहे. म्हणजेच या कंपनीच्या प्रत्येक शेअरधारकाला प्रत्येक शेअरवर 13 रुपयांचा अंतिम लाभांश मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएचएएल ही एक सरकारी कंपनी असून ती संरक्षण क्षेत्रात काम करते. गेल्या काही वर्षांत या कंपनीने सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. सरकारकडून या कंपनीला सतत अनेक ऑर्डर मिळालेल्या आहेत, परिणामी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय.
या डिव्हिडेंडसाठी कंपनीने 21 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शेअरधारकांनी मंजुरी दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत शेअरधारकांना डिव्हिडेंड दिला जाईल, असे कंपनीने जाहीर केले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने वित्त वर्ष 2023-24 मध्ये आयाधीच 22 रुपये प्रति शेअर याप्रमाणे डिव्हिडेंड दिलेला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स या कंपनीचा शेअर आज साधारण एका टक्क्यांनी घसरून 5,250 रुपयांच्या खाली आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हा शेअर मल्टिबॅगर म्हणून समोर आलेला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा शेअर गेल्या एका वर्षात साधारण 187 टक्क्यांनी वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 1370 टक्क्यांनी वाढलेला आहे.
image 7