Monsoon Travel : पावसाळ्यात लक्ष वेधतोय भारतातील 'हा' धबधबा! इंद्रधनुष्याचे अद्भूत दृश्य अनुभवा, स्वर्गसुखाची अनुभूती होईल
दक्षिण भारताला निसर्गाने जणू विशेष वरदान दिले आहे. इथली हिरवीगार हिल स्टेशन्स, सुंदर जंगलं, खळखळणारे धबधबे आणि शांत तलाव एक वेगळीच अनुभूती देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिणेतील हे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. पावसाळ्यात इथलं दृश्य जणू या ठिकाणाला निसर्गाचे विशेष वरदान लाभले आहे. केरळपासून तामिळनाडूपर्यंत आणि आंध्र प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी तुम्हाला भुरळ घालतील. पण पावसाळ्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे कर्नाटकातील धबधबे..
कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा- कर्नाटक राज्यातील जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो. तुम्हाला इंद्रधनुष्य बघायचे असेल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या धबधब्याला खालून पाहिल्यावर आकाशात रंगीबेरंगी इंद्रधनुष्याची अनुभूती मिळेल
पावसाळ्यात ठिकठिकाणी असलेल्या धबधब्यांपेक्षा हे तुम्हाला खरोखरच वेगळा अनुभव देईल. जोगा फॉल्सने या राज्याचे सौंदर्य वाढवले आहे यात शंका नाही. या धबधब्याचे पाणी हे 1600 फूट उंचीवरून पडते, ज्यामुळे त्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.
जोग धबधबा येथे जाण्यासाठी तुम्ही जंगलातून प्रवास करू शकता. स्वच्छ वातावरणातील हायकिंग तुमच्यासाठी खरोखरच संस्मरणीय असेल. निसर्गप्रेमींसाठी हे खास ठिकाण आहे.
येथे तुम्ही विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी, कयाकिंग, कोरेकल राईड आणि अशा अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. हे साहसी उपक्रम इथल्या रिसॉर्ट्सद्वारे चालवले जातात.
जोग धबधब्याला कसे पौहचाल? रेल्वेने- जवळचे रेल्वे स्टेशन तलगुप्पा रेल्वे स्टेशन आहे जे 20 किमी अंतरावर आहे. तुम्ही येथून कॅब आणि बस घेऊ शकता.
हवाईमार्गे- मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 219 किलोमीटर अंतरावर सर्वात जवळचे विमानतळ आहे.
रस्त्याने - बेंगळुरूहून ड्रायव्हिंग करून जोग फॉल्सपर्यंत पोहोचता येते. मात्र, येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 411 किलोमीटरचे अंतर कापावे लागेल.