Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
Gold Prices At New High मुंबई : 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचं वातावरण आणि आर्थिक क्षेत्रातील अनिश्चिततेचं वातावरण पाहता 2025 मध्ये सोनं 90 हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकतं. 10 ग्रॅम सोन्याचे दर 2024 मध्ये 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. 1 जानेवारी 2024 ला सोन्याचे दर 63000 रुपयांच्या दरम्यान होते. वर्ष संपताना सोन्याच्या दर 79000 रुपयांच्या आसपास आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमोडिटी मार्केटच्या एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार 2025 मध्ये सोन्याच्या दरात तेजी राहू शकते. जागतिक क्षेत्रातील अनिश्चिततेचं वातावरण आणि मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी केली जात असल्यानं सोने दरात वाढ होऊ शकते.
सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 79350 रुपये आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर 76600 रुपये आहेत. 2024 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगलं राहिलं. देशांतर्गत बाजारात सोन्यानं 30 टक्क्यांनी परतावा दिला आहे.30 ऑक्टोबरला 10 ग्रॅम सोन्याचे दर 82400 रुपयांपर्यंत पोहोचले होते. 2025 मध्ये सोन्याचे दर 85 हजारांचा टप्पा ओलांडू शकतात. याशिवाय ते 90 हजार रुपयांचा टप्पा ओलांडू देखील शकतात.
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष कमोडिटी अँड करन्सीचे रिसर्च विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये सोन्याच्या दरासंदर्भात सकारात्मक चित्र पाहायला मिळू शकतं. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये वाढ कमी राहू शकते. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 85 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. चांदीच्या दरात देखील वाढ होऊ शकते. एक किलो चांदीचे दर 1 लाख 10 हजार ते 1 लाख 25 हजारांपर्यंत जाऊ शकतात. व्याज दराचा परिणाम देखील होऊ शकतो,डॉलर कमजोर झाल्यास सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते.
कामा ज्वेलरीचे एमडी कोलिन शाह यांनी म्हटलं की डिसेंबर महिन्यात सोन्यामध्ये गुंतवणूक होत आहे. सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जात आहे. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक देखील हातभार लावत आहे. गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढत आहे.