Walmik Karad Surrender PHOTO: गळ्यात उपरणं, हातात भगवा धागा; 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यात काय घडलं?
पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयाबाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर समोर आले. यावेळी गळ्यात उपरणं आणि हातात भगवा धागा असल्याचं दिसून आले.
वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले.
सीआयडीसमोर शरण येण्याआधी वाल्मिक कराड यांनी व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
मी आज सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे शरण येत आहे, असं वाल्मिक कराड म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराड म्हणाले.
पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर जी शिक्षा मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असंही वाल्मिक कराड यांनी व्हिडीओद्वारे सांगितले.