Gold Rate : सोने दराचा MCX वर उच्चांक, सराफा बाजारात वेगळं चित्र, मुंबई, नवी दिल्लीसह विविध शहरांतील दर पाहा

सोने दरात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने दरानं उच्चांक गाठला. आज सोन्याचा दर 80450 रुपये होता. त्यानंतर सोन्याचे व्यवहार 80400 रुपयांवर सुरु होते. सोन्याचा काचा दर 80289 रुपये होता.चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचा एक किलोचा दर 91137 रुपये इतका आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीच्या सराफा बाजारात देखील सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. सोने दरात वाढ झाल्यानं काही ठिकाणी खरेदीदारांचा कमी प्रतिसाद दिसत असल्यानं दिल्लीत काही ठिकाणी मंगळवारी 160 रुपयांनी सोनं घसरलं होतं.

सराफा बाजारात प्रत्यक्ष ग्राहकांना 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 82840 रुपयांना मिळतेय. तर, सोमवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण झालीय. सोमवारी 10 ग्रॅम सोनं 83000 हजार रुपयांना मिळतं होतं.
नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 75240 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा दर 82070 रुपये इतका आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 75140 तर 24 कॅरेटचा एका कॅरेटचा दर 81970 रुपये इतका आहे.
चेन्नई, बंगळुरु पुणे, कोलकाता आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 75090 रुपये 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 81920 रुपये इतका आहे. टीप : हे दर प्राथमिक माहितीवर आधारित आहेत. प्रत्यक्ष बाजारात सोने आणि चांदीचे दर वेगवेगळे असू शकतात.