Gold Rate Today : दिलासादायक! चांदीचा दर 800 रूपयांनी घसरला; तर, सोन्याच्या दरातही किंचित घट

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंची किंमत कमी झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज मुंबई, पुणे, नाशिक, कोलकाता आणि राजधानी दिल्लीसह सोन्याच्या किंमतीत 170 रूपयांची घसरण झाली आहे.

काल सोन्याचे दर 55,930 रूपयांवर व्यवहार करत होते. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,770 रूपयांवर आला आहे.
चांदीच्या दरात आज मात्र मोठी घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 64,600 रूपयांवर आला आहे.
चांदीच्या दरांत 800 रूपयांची घट झाल्यामुळे ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्या-चांदीच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करतात.
सोनं, चांदी प्रमाणेच शिसे, जस्त आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतीतही घट झाली आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे आजचे दर 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 1,842.50 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता.