Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात आज देखील घसरण पाहायला मिळाली. देशातील सराफ बाजार आणि कमोडिटी बाजारात सोन्याचे दर घसरले. गेल्या काही दिवसांपासून सोने दरात घसरण होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील सराफा बाजारात सोने दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 160 रुपयांनी घसरुन 77840 वर पोहोचलं. एमसीएक्सवर सोन्याचा दर 76855 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचला.
चांदीचा आजचा दर 92500 रुपये किलोवर आला आहे. यामध्ये देखील घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या दरातील चढ उताराचा परिणाम चांदीच्या दरावर पाहायला मिळतोय.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 77990 रुपये असून आज 160 रुपयांची घसरण झाली. मुंबईतील 10 ग्रॅम सोन्याच दर 77840 रुपयांवर आहे. चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि कोलकाता येथे देखील दर 77840 रुपये 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद आणि पाटना येथे येथे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 160 रुपयांनी घसरला. या दोन शहरात सोन्याचा दर 77890 रुपये होता. तर, जयपूर आणि लखनौमध्ये 77990 रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळत आहे.