Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
मकर संक्रातीनंतर लग्नसराई सुरु होत आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरु आहे, रुपया कमजोर होत आहे, असं चित्र असताना सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात 10 ग्रॅम सोन्याचा दर 850 रुपयांनी वाढला आहे. चांदीच्या दरातही 1300 रुपयांची वाढ झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीच्या सौद्याचा बाजार सुरु झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा दर 78375 रुपये होता. तो 78714 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
नवी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 79813 रुपये आहे. जयपूरमध्ये सोन्याचा दर 79806 रुपये आहे. लखनौमध्ये सोन्याचा दर 79829 रुपये असून चंदीगडमध्ये 79822 तर अमृतसरमध्ये 10 ग्रॅमचा दर 79840 रुपये आहे.
दिल्लीतील बाजारात एक किलो चांदीचा दर 96500 रुपयांवर पोहोचला आहे. जयपूरमध्ये चांदीचा दर 96900 रुपये, लखनौमध्ये 97400 रुपये तर चंदीगडमध्ये 95900 रुपये आणि पाटणामध्ये 96600 रुपये इतका आहे.
मुंबईतील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 79630 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 72990 रुपये इतका आहे. पुण्यातही सोन्याचा दर मुंबईप्रमाणंच आहे. महागाईच्या काळात किंवा बाजार घसरत असताना सोन्यातील गुंतवणुकीला महत्त्व दिलं जातं.