दिवाळीच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात तेजी
धनत्रयोदशीदिवशी मोठ्या प्रमाणावर लोक सोन्या चांदीची खरेदी करतात. पण सध्या सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसुन येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2023 या वर्षात सोन्याच्या किंमतीचा तब्बल 5 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
27 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव 71 हजार 717 रुपये प्रति किलो होता. 3 ऑक्टोबर 2023 रोजी चांदीचा भाव हा 72 हजार 252 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
एका आठवड्यात चांदीच्या दरात 535 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका आठवड्यात चांदीच्या दरात 0.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
काल चांदीच्या दरात 852 रुपयांची वाढ झाली होती. गुरुवारी चांदीचा भाव 71,400 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
काल सोन्याच्या दरात 109 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 3 ऑक्टोबर रोजी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61 हजार 20 रुपये झाला आहे.
गेल्या आठवडाभरात सोने स्वस्त झाले आहे. या काळात सोन्याच्या भावात 136 रुपयांनी घट झाली आहे.
सुमारे एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 61 हजार 156 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. या संदर्भात, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 0.22 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
दिवाळीत फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61 हजार 500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.