GOLD Rate Today : अखेर सोन्याच्या दरात तेजी,चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडतंय?
गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 76300 रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या एक किलोचा दर 89300 रुपयावर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMCX वर 9.45 वाजता सोन्याच्या वायदेबाजारात 133 रुपयांची तेजी होती. सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 76277 रुपयांवर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा सोने दर 76144 प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीच्या वायदेबाजारात देखल 172 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. एक किलो चांदीचा दर 89290 रुपयांवर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा दर 89118 रुपयांवर होता.
सोमवारी राजधानी नवी दिल्लीत सराफ बाजारात सोने दरात 570 रुपयांची वाढ झाली होती. सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 78130 रुपयांवर पोहोचला होता.
दुसरीकडे औद्योगिक कंपन्या आणि शिक्का निर्मात्यांकडून मागणी वाढल्यानं चांदीच्या दरात देखील 1850 रुपयांची वाढ होऊ चांदी 90 हजार रुपये किलोवर पोहोचली होती.99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत सोमवारी 570 रुपयांनी वाढून 78300 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचली होती.