स्विमिंग पूल, मोठं गार्डन अन् बरंच काही, अल्लू अर्जुनचं 100 कोटींचं घर नेमकं कसं?
Allu Arjun House Video: दाक्षिणात्त्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटाच्या माध्यमातून अल्लू अर्जुन संपूर्ण भारतभरात ओळखला जातोय. दरम्यान, अल्लू अर्जुनच्या आलीशान घराचीही तेवढीच चर्चा होत आहे. त्याचे हैदराबादमध्ये जुबली येथे 100 कोटी किमतीचे आलिशान घर आहे.
अल्लू अर्जुनच्या या घरात अनेक आधुनिक सुविधा आहेत. त्याची पत्नी स्नेहा नेहमी सोशल मीडियावर फोटो अपलोड करते. तिच्या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनच्या घराची झलक दिसते.
अल्लू अर्जुनच्या घराचे नाव ब्लेसिंग असे आहे. त्याच्या या घरात पत्नी, दोन मुलं राहतात. त्याने आपल्या घराला पांढरा रंग दिलेला आहे. बाहेरुन हे घर फारच सुंदर दिसते.
त्यांच्या घरात एक स्विमिंग पुलदेखील आहे. अल्लू अर्जुन आपल्या मुलांसोबत या स्विमिंग पुलमध्ये पोहताना दिसतो.
अल्लू अर्जुनच्या या आलिशान बंगल्यात मोठे गार्डनर आहे. या ओपन गार्डनवर अल्लू अर्जुनची मुलं खेळताना दिसतात.
अल्लू अर्जुनच्या घराचा फोटो