Adani Stocks : अमेरिकन शेअर बाजारात अदानींना झटका; डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेर, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 यादीतूनही घसरले
अदानी समुहाचे शेअर्स (Adani Group Shares) शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सलग सातव्या दिवशी घसरले आहेत. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआठवड्याच्या शेवटच्या दिवशी 3 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत.
गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्येही मोठी घसरण झाली आहे. नवीन रिपोर्टनुसार, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर गेले आहेत.
दरम्यान, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE - National Stock Exchange) अदानी समूहावर (Adani Group) करडी नजर आहे. NSE ने अदानी समूहाचे (Adani Group) तीन शेअर्स देखरेखीखाली ठेवले आहेत.
शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स या शेअर्सवर अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपाययोजना (ASM) अंतर्गत करण्यात आल्या आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, आता गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या टॉप-20 च्या बाहेर पडले असून ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) अदानी आता 22 व्या क्रमांकावर आहेत.
आज शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी अदानी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. गेल्या 5 दिवसांत अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत.
NSE ने अदानी समुहाचं स्टॉक्सचे मॉनिटरिंग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंट्राडे ट्रेडिंगसाठी देखील 100 टक्के अपफ्रंट मार्जिन आवश्यक असेल आणि यामुळे शॉर्ट सेलिंगला आळा बसेल.
NSE ने ASM फ्रेमवर्क (Additional Surveillance Measure) म्हणजे अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपायोजनांमध्ये अदानी ग्रुपचे तीन शेअर्स ठेवले आहेत.
अदानींची संपत्ती आता 61.3 अब्ज डॉलरवर घसरली आहे. गेल्या 24 तासांत अदानींना 10.7 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.
आता अदानी समुहाला अमेरिकन शेअर बाजारातून झटका बसला आहे. अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7 फेब्रुवारीपासून डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये व्यापार करणार नाही.
गेल्या दोन आठवड्यांपासून अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे अनेक वेळा शेअर्सवर लोअर सर्किट लागलं.
अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने त्याच्या एकूण संपत्तीतही सातत्याने घट होत आहे.