गुंतवणुकीतून चांगला परतावा हवाय? मग 'हे' आहेत सर्वोत्तम पाच पर्याय!
बदलत्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याआधी बँकेतील एफडी हा एकमेव चांगला आणि उत्तम पर्याय मानला जायचा. मात्र आता एफडीसोबतच गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातील सर्वांत पहिला पर्याय हा शेअर बाजाराचा आहे. मात्र या पर्यायात जोखीम असते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्यूच्यूअल फंड हादेखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.
सोने खरेदी हादेखील एक गुंतवणुकीचाच पर्याय आहे. सोने खरेदीसाठी गोल्ड बॉण्ड, ETF आदी पर्याय उपलब्ध आहेत. यासह फिजिकल गोल्ड (सोन्याची धातूरुपात खरेदी) हादेखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे.
या सर्वांपेक्षा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय हवा असेल तर पीपल प्रोव्हिडेंट फंड हादेखील चांगला पर्याय आहे. यासह पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्यामध्ये जोखमीशिवाय गुंतवणूक करता येते.
रियल इस्टेट हादेखील आज गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. जागा, घर खरेदी करूनही काही वर्षांनी तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.