SIP फक्त श्रीमंतांसाठीच असते? पैसे बुडण्याचा धोका असतो का? जाणून घ्या 'या' पाच प्रश्नांची सोपी उत्तरं!
एसआयपी फक्त श्रीमंतासाठीच आहे का? असं विचारलं जातं. पण खरं म्हणजे एसआयपी हा पर्याय प्रत्येकासाठी आहे. अगदी शंभर रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते. म्हणजेच फक्त श्रीमंत व्यक्तीच नव्हे तर सामान्य माणूससुद्धा एसआयपीच्या माध्यमातून म्यूच्यूअल फंडांत गुंतवणूक करू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसआयपीमध्ये हाय रिटर्न्सची गॅरंटी आहे का? असे विचारले जाते. याचं उत्तर म्हणजे एसआयपी हाय रिटर्नरची हमी देत नाही. मात्र शेअर बाजाराच्या तुलनेत एसआयपीमध्ये पैसे बुडण्याचा धोका कमी आहे, असे म्हटले जाते.
जास्त कालावधीसाठी एसआयपी केल्यावरच एसआयपीमध्ये फायदा होतो का, असे विचारले जाते. पण खरं म्हणजे चांगला अभ्यास करून एसआयपीमध्ये कमी काळासाठी पैसे गुंतवल्यावरही चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.
म्यूच्यूअल फंड आणि एसआयपीमध्ये नेमका फरक काय आहे? असेही विचारले जाते. खरं म्हणजे म्यूच्यूअल फंड हा गुंतवणुकीसाठीचा एक मंच आहे. तर एसआयपी गुंतवणुकीचे एक माध्यम आहे. एसआयपीच्या माध्यमातूनच म्यूच्यूअल फंडातील वेगवेगळ्या फंडांत गुंतवणूक करता येते.
एसआयपीचा संबंध हा फक्त इक्विटी म्यूच्यूअल (Equity Funds) फंडाशी असतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र जोखीम पत्करायची नसेल तर डेब्ट फंडातही (Debt Funds) एसआयपी करता येते.