निळी, लाल ते कॉफी कलरची साडी, सात वेळा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांचे सात लूक!
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 सालापासून आतापर्यंत एकूण 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रत्येकवेळी अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी वेगळी साडी परिधान केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक वर्ष 2024-25 साठी 23 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यांनी सर्वांत अगोदर 2019 साली पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.
2019 निर्मला सीतारामन यांनी गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. गुलाबी रंग हा स्थिरता आणि गंभीर्याचे प्रतिक असते. 1970 नंतर इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारामन यांच्या रुपात दुसऱ्या महिलेने अर्थसंकल्प सादर केला.
2020 साली अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. पिवळा रंग उत्साह उर्जेचे प्रतीक मानले जाते. 2020 साली सीतारामन यांनी एकूण 2 तास 42 मनिटे अर्थसंकल्प सादर केला होता.
2021 साली कोरोना महासाथीच्या काळात निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची बॉर्डर असलेली ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान केली होती.
2022 साली निर्मला सीतारामन यांनी कॉफी कलरची साडी परिधान केली होती.
2023 साली अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती. लाल रंग प्रेम, ताकत, धौर्याचे प्रतीक असतो. 2024 सालाच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी सीतारामन यांनी निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.