Dhanteras Gold Buying : पॅन कार्ड शिवाय किती ग्रॅम सोनं खरेदी करू शकता?
दिवाळी, धनत्रयोदशी निमित्ताने सोने खरेदी केले जाते. सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनं खरेदी करण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.
सोनं खरेदी करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डची गरज भासते.
मात्र, एका मर्यादेपर्यंत सोन खरेदी केल्यास पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता भासत नाही.
प्राप्तिकर नियमांनुसार, जर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी केले तर तुमचे पॅन कार्ड किंवा केवायसी कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करू शकता, मात्र यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावे लागेल.
याशिवाय तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी केल्यास, तुम्हाला कार्ड किंवा चेकद्वारे पेमेंट करावे लागेल.
जर आपण भारतात सोने बाळगण्याबद्दल नियम आहे. विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. तर अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने सोबत बाळगू शकते.
तर पुरुष 100 ग्रॅम सोने सोबत बाळगू शकतात.