CRR : सीआरआर म्हणजे काय? बँकिंग व्यवस्थेत 1.16 लाख कोटी रुपये कसे येणार?
सीआरआर म्हणजे रोख राखीव गुणोत्तर. कोणत्याही वाणिज्य बँकेला तिच्या एकूण ठेवींच्या प्रमाणात ठरावीक रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे बिनव्याजी स्वरूपात ठेवावी लागते, यालाच सीआरआर म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूर्वी सीआरआरचे प्रमाण 4.5% होते, परंतु आता ते कमी करून 4% करण्यात आले आहे.
उदाहरणार्थ, जर बँकेच्या ठेवी 100 रुपये असतील, तर त्यातील 4.5 रुपये आधी आरबीआयकडे ठेवावे लागत होते, पण आता त्याऐवजी फक्त 4 रुपयेच ठेवावे लागतील.
सीआरआर घटल्यामुळे बँकांकडे अधिक निधी उपलब्ध होतो, जो ग्राहकांना कर्जाच्या स्वरूपात देता येतो.
थोडक्यात, सीआरआर कमी करून अर्थव्यवस्थेत अधिक पैसा उपलब्ध करून दिला जातो.
यामुळे नागरिकांच्या हाती अधिक पैसा येईल, जो खर्च आणि गुंतवणुकीसाठी वापरला जाईल.
सीआरआर 4% केल्यामुळे बँकिंग व्यवस्थेत तब्बल 1.16 लाख कोटी रुपये येणार आहेत.
जरी रेपो दरात बदल केलेला नसला, तरी बँकिंग व्यवस्थेत निधी इंजेक्ट करून आर्थिक वाढीस चालना देण्याचा सरकार आणि आरबीआयचा प्रयत्न आहे.