भरपूर परतावा हवाय? मग निवडा 'हे' तीन स्टॉक, मिळू शकतात चांगले रिटर्न्स
सध्या मुंबई शेअर बाजार तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत नेमक्या कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा स्थितीत सेठी फिनमार्ट या ब्रोकरेज फर्मचे विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म, पोझीशनल, लाँग टर्मसाठी तीन स्टॉक सुचवले आहेत.
हे तिन्ही स्टॉक मीडकॅप श्रेणीतील आहेत. यामध्ये नवरत्न पीएसयू HUDCO, Happiest Minds आणि JSW Infra यांचा समावेश आहे.
विकास सेठी यांनी लाँग टर्मसाठी JSW Infra या कंपनीत गुंतवणूक करण्याचे सूचवले आहे. JSW Infra ही JSW ग्रुपची कंपनी आहे. सेठी यांनी या कंपनीत गुंतवणूक करताना 450 रुपयांचे टार्गेट ठेवण्याचा सल्ला दिलाय. 9 ते 12 महिने स्टॉक होल्ड करावा असं सेठी यांनी सांगितलंय. भविष्यात हा स्टॉक 27 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोजिशनल टर्ममध्ये आयटी कंपनी Happiest Minds चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला सेठी यांनी दिला. त्यासाठी 875 रुपयांचे टार्गेट तर 810 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा, असं सेठी यांनी सुचवलं आहे.
तर एक ते तीन महिन्यांसाठी HUDCO या कंपनीचे शेअर खरेदी करावेत, असे सेठी यांनी सुचवले आहे. त्यासाठी टार्गेट 300 रुपये प्रति शेअर आणि स्टॉप लॉस 277 रुपये ठेवण्याचे सुचवले आहे. अशा प्रकारचा विचार ठेवल्यास आगामी काळात हा स्टॉक तुम्हाला 7 टक्के रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)