चिंता सोडा अन् फक्त 'हे' पाच शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडा, भविष्यात मिळू शकेल दमदार परतावा
Stocks Of The Day: सध्या शेअर बाजाराची स्थिती लक्षात घेता गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही स्टॉक्स सूचवले आहेत. या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमार्केट एक्सपर्ट कुणाल सरावगी यांनी BSE हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी सरावगी यांनी 4950 आणि 5100 असे दोन टार्गेट दिले आहेत. तसेच तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 4815 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा, असा सल्ला त्यांनी दिलाय.
गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ सिद्धार्थ सेडानी यांनीदेखील Voltas हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1810 रुपये आणि 2018 रुपये असे दोन टार्गेट दिले आहेत. त्यांनी हा शेअर खरेदी करता स्टॉप लॉस सांगितलेला नाही.
मार्केट एक्सपर्ट सच्चितानंद उत्तेकर यांनी HAL या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 4550 रुपये आणि 4600 रुपये टार्गेट ठेवण्याचे सूचवले आहे. सोबतच या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 4385 रुपये स्टॉप लॉस ठेवण्यास सूचवले आहे.
मार्केट एक्सपर्ट सुमीत बगडिया यांनीदेखील एचएएल या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 4550 रुपये आणि 4600 रुपये टार्गेट दिलेले आहे. सोबतच या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 4330 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्यात यावा, असेही बगडिया यांनी सूचवले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो
image 8