Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोमवारी 'हे' चार स्टॉक देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस किती?
सध्या शेअर बाजार तेजीत आहे. हीच स्थिती लक्षात घेता सेठी फिनमार्ट या ब्रोकरेज फर्मच्या विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppValor Estate ही एक रियल इस्टेट क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. हा शेअर शुक्रवारी 195 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी 180 स्टॉपलॉस तर 210 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. दोन आठवड्यांत हा शेअर 4.5 टक्क्यांनी वाढला आहे.
Updater Services हा शेअर सध्या 383 रुपयांवर आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 365 रुपयांचा स्टॉपलॉस तर 410 रुपयांचे शॉर्टटर्म टार्गेट ठेवायला हवे. क्लिनिंग, हाउस किपिंग यासारख्या सेवा या कंपनीकडून दिल्या जातात. या कंपनीने दोन आठवड्यांत 3.6 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
फ्युचर अँड ऑप्शन कॅटेगिरीमध्ये Hindustan Aeronautics Future या कंपनीत गुंतवणू ककरता येईल. हा शेअर शुक्रवारी 4348 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये गुंतवणूक करत अशाल तर 4450 रुपयांचे शॉर्टटर्म टार्गेट आणि 4260 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा.
F&O सेगमेंटमध्ये तज्ज्ञांनी GMR Airports या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी हा शेअर 94.6 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर 92 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)