Bigg Boss Marathi : आर्या बिग बॉसच्या घरात परतणार? अभिनेत्री म्हणते, 'ती सीक्रेड रुममध्ये...'
आर्या बिग बॉसच्या घरात परतणार अशी शक्यता बिग बॉस प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. (PC : colorsmarathi/insta)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉस मराठीच्या घरात निक्कीवर हात उगारल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. असं असलं तरी आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही. (PC : insta)
(PC : colorsmarathi/facbook)
बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढल्यानंतर नेटकऱ्यांनी शोवर टीका करण्यास सुरुवात केली असून आर्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. (PC : colorsmarathi/insta)
आर्याचं चुकलं एकस कानाखाली नाही, तर तिला आणखी मारलं पाहिजे होतं, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. (PC : colorsmarathi/insta)
निक्की आणि अरबाजच्या मुद्द्यावरुनही प्रेक्षकांनी बिग बॉसला धारेवर धरलं आहे. (PC : colorsmarathi/insta)
आर्याने निक्कीला मारलेलं टीव्हीवर दाखवू शकत नाहीत, पण अरबाज आणि निक्कीचे चाळे लहान मुलांना दाखवू शकतात का, असा सवाल प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे. (PC : colorsmarathi/insta)
काही प्रेक्षकांनी आर्याला सीक्रेट ठेवल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. टीव्ही अभिनेत्री साक्षी गांधी हिनेही म्हटलं की, 'आर्या सीक्रेट रुममध्ये असणार, सोमवारी कळेल'.
अभिनेता पुष्कर जोग यानेही आर्याला पाठिंबा देत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. (PC:jogpushkar/insta)
आर्याने घराबाहेर पडताच सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने ब्रोकन हार्ट इमोजी शेअर केला असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (PC:Arya.qk/insta)