फक्त चार आठवड्यांसाठी 'या' मिनिरत्न कंपनीत पैसे गुंतवा, मिळू शकतात दमदार रिटर्न्स
Miniratna Company: गेल्या काही दिवसांपासून मिनिरत्न कंपनी हिंदुस्तान कॉपर या कंपनीचा शेअर चांगली कामगिरी करताना दिसतोय. सप्टेंबर महिन्यात या शेअरने चांगला परतावा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या हा शेअर 329.30 रुपयांवर (Hindustan Copper Share Price) आहे. या शेअरची सध्याची स्थिती पाहता कॅनरा बँक सिक्योरिटीज या ब्रोकर हाऊसने या शेअरला 4 ते 5 आठवड्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
कॅनरा बँक सिक्योरिटीज या ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर तो 325 रुपयांच्या रेंजमध्ये आल्यास त्याला खरेदी करा. तर या शेअरसाठी पहिले टार्गेट 340 रुपये आणि दुसरे टार्गेट 358 रुपये ठेवायला हवे.
22 मे रोजी या स्टॉक 415 रुपयांवर गेला होता. 12 सप्टेंबर रोजीपासून हा शेअर सलग चांगल्या स्थितीत आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)