शेअर बाजारात 'या' 6 स्टॉक्सची कमाल, 5 दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Industries): शुक्रवारी या शेअरचे मूल्य 0.54 टक्क्यांनी वाढून हा शेअर 6,142 रुपयांवर स्थिरावला. या शेअरने गेल्या आठवड्यात एकूण 6 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएस्कॉर्ट्स कुबोटा (Escorts Kubota): संपूर्ण आठवड्यात या शेअरमध्ये 4 टक्क्यांची तेजी आली. हा शेअर शुक्रवारी 0.31 टक्क्यांच्या तेजीसह 3,803 रुपयांवर बंद झाला.
पीबी फिनटेक (PB Fintech): हा शेअर संपूर्ण आठवड्यात 6 टक्क्यांनी वाढला. हा शेअर शुक्रवारी 1,814 रुपयांवर स्थिरावला.
डिक्सन टेक्नोलॉजीज (Dixon Technologies): गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये 8 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी हा शेअर 1.36 टक्क्यांच्या तेजीसह 13,027.85 रुपयांच्या मूल्यावर बंद झाला.
बजाज ऑटो (Bajaj Auto): बजाज ऑटो या शेअरमध्ये शुक्रवारी फारसा बदल झाली नाही. हा शेअर शुक्रवारी 11,734.50 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांनी रिटर्न्स दिले.
ओरॅकल फायनॅन्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर (Oracle Financial Services Software): या शेअरमध्ये सुक्रवारी 5.70 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी हा शेअर 12,235 रुपयांवर बंद झाला. गेल्या पूर्ण आठवड्यात या शेअरमध्ये एकूण 13 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)