म्युच्यूअल फंडात पैसे गुंतवताय? मगा अगोदर 'या' गोष्टी जाणून घ्या, अन्यथा आर्थिक फटका बसण्याची शक्यता
आजकाल अनेकजण म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत. मात्र म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी योग्य फंडाची निवड करणे गरजेचे असते.
mutual fund investment (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8
Mutual Fund Investment: म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. या मंचावर गुंतवणूक करताना योग्य म्युच्यूअल फंड निवडणे फार महत्त्वाचे आहे.
2/8
अनेकजण नेमकं कोणत्या म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करावी, याचा विचार करतात. मात्र भूतकाळात एखाद्या म्युच्यूअल फंडाने चांगले रिटर्न्स दिले म्हणजे भविष्यातही तो चांगला परतावा देईलच, असे गृहित धरणे चुकीचे आहे.
3/8
एखादा म्युच्यूअल फंड हा प्रत्येकासाठीच गुंतवणुकीसाठी चांगला असतो, असे गृहित धरणे चुकीचे आहे. अमूक म्युच्यूअल फंड हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगला असू शकतो. तर हाच म्युच्यूअल फंड हा दुसऱ्या व्यक्तीसाठी चांगला नसू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक गरज लक्षात घेऊनच योग्य त्या म्युच्यूअल फंडाची निवड करावी.
4/8
योग्य म्युच्यूअल फंडाची निवड करण्यासाठी अगोदर म्युच्यूअल फंडाचा कालावधी आणि जोखीम याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे? हे लक्षात घेऊनच तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करावी.
5/8
जोखीम आणि कालावधी लक्षात घेऊन योग्य म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करा. तुम्ही एक किंवा तीन वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी Debt फंड योग्य असतो.
6/8
तुम्ही 6 ते 8 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यासाठी विचार करत असाल तर त्यासाठी इक्विटी म्युच्यूअल फंड योग्य ठरतो. तुम्ही 3 ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी hybrid fund चांगला पर्याय ठरू शकतो.
7/8
म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करण्याआधी फंड मॅनेजर कोण आहे? याची माहिती घ्या. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहण्यास मदत होईल.
8/8
image 8
Published at : 15 Sep 2024 10:34 AM (IST)