Best Selling Cars : कोरोना काळात सर्वाधिक विकलेल्या कार, टॉप 5 मध्ये मारुतीच्या चार कार
(photo courtesy : cardekho)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीची स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर राहिली. या कारच्या या सहामाहीत आतापर्यंतच्या 97,312 युनिट्सची विक्री झाली आहे. या कारमध्ये नुकताच ड्युअल जेट के 12 इंजिनसह बदल करण्यात आला आहे. या कारची किंमत एक्स-शोरूम किंमत 5.73 लाख रुपयांपासून 8.40 लाख रुपयांपर्यंत आहे. Maruti Suzuki Swift (photo courtesy : cardekho)
दुसर्या क्रमांकावरही मारुती सुझुकीच्या कारने स्थान मिळवलं आहे. कंपनीच्या लोकप्रिय कार वॅगनआरने या सहामाहीत 94,839 वाहनांची विक्री केली. गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये या कारची सर्वाधिक विक्री झाली आहे. मारुती सुझुकी वॅगन आरची किंमत 4.80 लाखांपासून 6.33 लाख रुपयांपर्यंत आहे. Maruti Suzuki WagonR (photo courtesy : cardekho)
या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही मारुती सुझुकीची कार आहे. मारुती सुझुकीची बलेनो ही कंपनीची भारतात सर्वाधिक विक्री होणारी प्रीमियम हॅचबॅक कार आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या 93,823 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. बलेनोची किंमत 5.98 लाखांपासून ते 9.30 लाख रुपयांपर्यंत आहे. Maruti Suzuki Baleno (photo courtesy : cardekho)
मारुती सुझुकी अल्टो 800 ही कार या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सन 2021 च्या निम्म्या कालावधीत आतापर्यंत या कारच्या 85,616 वाहनांची विक्री झाली आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपयांपासून ते 4.60 लाखांपर्यंत आहे. Maruti Suzuki Alto 800 (photo courtesy : cardekho)
मारुती सुझुकीनंतर ह्युंदाईची क्रेटा ही कार या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ही कार कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. यावर्षी आतापर्यंत कंपनीने क्रेटाच्या 67,283 युनिट्सची विक्री केली आहे. या क्रेटा कारची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून 17.70 लाख रुपयांपर्यंत आहे. Hyundai Creta (photo courtesy : cardekho)