नवरत्न कंपनीचा धमाका! एका वर्षात 100 टक्के रिटर्न्स; तुमचंही नशीब पलटणार?
शेअर बाजारात अशा काही कंपन्या असतात ज्या आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवल्यास काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या नवरत्न कंपनीचा (Navratna Company) दर्जा लाभलेल्या अशाच एका कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे. या कंपनीचे नाव IREDA (इरेडा) असे आहे.
सोमवारी म्हणजाचे 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.80 टक्क्यांच्या घसरणीसह 210.15 रुपयांवर बंद झाला.
या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षी साधारण 100 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. गेल्या सहा महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
IREDA या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 310 रुपये तर 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य 49.99 रुपये आहे. या कंपनीचे बाजारमूल्य 56,483.38 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)