Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayodhya : मुकेश अंबानी यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला जाहीर केली 2.51 कोटी रुपयांची देणगी!
राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरातून लोकांनी अयोध्येत उपस्थिती लावली, त्यामध्ये अनेक मोठे उद्योगपती, खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्सचा समावेश होतो. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. (Photo : PTI)
मुकेश अंबानी यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. अंबानी कुटुंबाने अभिषेक प्रसंगी मंदिराला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. (Photo : PTI)
अयोध्येच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानालाही सजवलं होतं. (Photo : PTI)
अंबानींचे हे निवासस्थान फुलांनी आणि विद्युत रोषणाईंनी झळाळून उठलं होतं. (Photo : PTI)
मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका आणि होणारी सून राधिका मर्चंट यांच्यासह अयोध्येत होते. (Photo : PTI)
मंदिरात जाण्यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की, आज प्रभू राम येत आहेत. 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. (Photo : PTI)
रिलायन्सच्या अध्यक्षांनी यापूर्वीही अनेक मंदिरांना देणगी दिली आहे. (Photo : PTI)
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला त्यांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली होती. (Photo : PTI)
फेब्रुवारी 2023 मध्ये, त्यांनी आणि त्यांचा मुलगा आकाश यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि ट्रस्टला 1.51 कोटी रुपये दान केले. (Photo : PTI)