आयफोन 15 आता आणखी स्वस्त, मिळणार बम्पर डिस्काऊंट, जाणून घ्या किती रुपये वाचणार?

ॲपल (Apple) या कंपनीने गेल्या वर्षी iPhone 15 Series लॉन्च केली होती. या वर्षी लवकरच बाजारात iPhone 16 सीरीज लॉन्च होणार आहे. या सिरीजमध्ये मल्टीपल AI फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दरम्यान, आता ॲपलने iPhone 15 च्या किमतीत घट केली आहे. iPhone ची आवड असणाऱ्यांसाठी ही एका प्रकारची खुशखबरच आहे. (iPhone 15 on Discount) तुम्हाला iPhone 15 खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आता कमी पैसे द्यावे लागमार आहेत.

ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर (Amazon) आयफोन 15 वर बम्पर सुट दिली जात आहे.
ॲमेझॉन या संकेतस्थळावर iPhone 15 हा 70 हजार 900 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
या आयफोनची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. ॲमेझॉनवर तुम्हाला या आयफोनवर 9,000 रुपयांची सुट मिळेल. म्हणजेच आयफोन 15 वर तुम्हाला तब्बल 11 टक्के सुट मिळणार आहे.
तुम्ही अगोदरच iPhone वापरत असाल तर एक्स्चेंज ऑफरच्या माध्यमातून तुम्ही आणखी कमी पैशांत नवा आयफोन खरेदी करू शकता.
संग्रहित फोटो