Ananya Birla : एका झटक्यात 1500 कोटींची कंपनी खरेदी केली, कोण आहे अनन्या बिर्ला?
कॉरपोरेटच्या दुनियेत सध्या अनन्या बिर्लाची जोरदार चर्चा सुरु आहे. अनन्याच्या कंपनीने सचिन बंसलची चैतन्य इंडिया कंपनीचा ताबा घेतलाय.त्यानंतर स्वतंत्र माइक्रोफिन एयूएमच्या बाबतीत देशात दुसरी सर्वात मोठी एनबीएफसी-एमएफआय झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनन्या बिर्लाच्या कंपनीने ऑगस्टमध्ये या डीलची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलेले की 1,479 कोटी रुपयात चैतन्य इंडिया कंपनी विकत घेणार असल्याचे सांगितले होते.
फ्लिपकार्टपासून वेगळं झाल्यानंतर सचिन बंसल यांनी फिनटेक स्टार्टअप सुरु केले होते. चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड त्याचीच सब्सिडियरी आहे. आता चैतन्य इंडिया स्वतंत्र मायक्रोफिनचा भाग झालीय.
अनन्या बिर्ला प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. अनन् ने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे आणि सैईद बिजनेस स्कूल यासारख्या ठिकाणावरुन शिक्षण पुर्ण केलेय.
अनन्या बिर्लाने देशभरातील महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी स्वतंत्र मायक्रोफिन कंपनीची सुरुवात केली होती.
चैतन्य इंडिया सोबतच्या करारानंतर स्वतंत्र मायक्रोफिनच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 13 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. स्वतंत्र मायक्रोफिन आता NBFC-MFI विभागामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
स्वतंत्र मायक्रोफिन ग्राहकांना थेट बँक खात्यात कर्ज वाटप करते. त्यासाठी कंपनी 19.75 टक्के ते 24.5 टक्के व्याज घेते. कंपनी MSME कर्ज देखील प्रदान करते, ज्याचा व्याज दर 23 टक्के आहे.