Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर, SFB ची ग्राहकांना मोठी ऑफर
Small Finance Banks FD Rates : गुंतवणुकीचे विविध पर्याय असतानाही लोक एफडीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यावर भर देतात. आपण अशाच स्मॉल सेव्हिंग बँकबद्दल जाणून घेऊयात. जिथे इतर बँकांच्या तुलनेत ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज दिले जाते. तीन वर्षांपर्यंत एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळतेय. BankBazaar च्या आधारे ही लिस्ट तयार करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्योदय स्मॉल फायन्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ग्राहकांना 8.60 टक्के व्याज मिळते. एक लाख रुपयांची तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना 1.29 लाख रुपये मिळतील.
जन स्मॉल फायन्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायन्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याजदर मिळते. एक लाख रुपये तीन वर्षांसाठी गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना 1.29 लाख रुपये रिटर्न मिळतील.
फिनकेयर स्मॉल फायन्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्के व्याज मिळते. या बँकमध्ये एक लाख रुपये तीन वर्षांसाठी गुंतवले तर 1.27 लाख रुपये रिटर्न मिळतील.
AU स्मॉल फान्स बँक ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीसाठी 8 टक्के व्याज देतेय. तीन वर्षांपर्यंत या बँकेत एक लाख रुपये गुंतवल्यास 1.27 लाख रुपये रिटर्न मिळतील.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याजदर मिळते. 1 लाख रुपये तीन वर्षांसाठी या बँकमध्ये गुंतवल्यास 1.26 लाख रुपये मिळतील.