CNG Price Hike: एकाच महिन्यात दोनदा महागाईचा झटका; 'या' राज्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ
मागील काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात वाढ सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही शहरांमध्ये सीएनजी आणि डिझेलच्या दरात फारसा फरक राहिला नाही.
आता, पुन्हा एकदा गुजरातमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
अदानी समूहाच्या अदानी टोटल गॅसने सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ केली आहे. तरीदेखील, गुजरात गॅसपेक्षा हा दर कमी आहे.
गुजरातमध्ये अदानीच्या सीएनजी गॅसचा दर 80.34 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
राज्य सरकारच्या गुजरात गॅसने काही दिवसांपूर्वी 3.5 रुपये प्रति किलो इतकी दरवाढ केली होती.
गुजरात गॅसने 4 जानेवारी 2023 रोजी सीएनजीच्य दरात 5 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर गुजरात गॅस सीएनजीचा दर प्रतिकिलो 78.52 रुपये इतका झाला होता.
अदानी समूहाने सीएनजी दरवाढ केल्यानंतर आता देशभरातही सीएनजी दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही सीएनजीचे दर 80 रुपयांहून अधिक आहेत.
आगामी काळात सीएनजी दरवाढ झाल्यास ग्राहकांच्या खिशावर आणखी मोठा बोझा पडणार आहे.