Aadhaar Card : आधार कार्ड क्रमांक 12 अंकी का असतो? तुम्हाला माहिती आहे का या मागील कारण, जाणून घ्या

आधार कार्ड हे आता महत्त्वाचं कागदपत्र झालेलं आहे. आधार कार्ड व्यक्तीच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी वापरलं जातं. विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना नागरिकांना आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यूआयडीएआयनं ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं झालं असेल त्यांना ते अपडेट करुन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मोफत आधार कार्ड साठी मुदत देखील डिसेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

आधार कार्ड क्रमांक 12 अंकी असतो. मात्र, मोबाईल क्रमांक 10 अंकी असातना आधार कार्ड क्रमांक 12 अंकी का असतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भारताची लोकसंख्या जवळपास 140 कोटीपेक्षा जास्त असल्यानं नागरिकांची यूनिक ओळख असणं आवश्यक असतं. त्याचा विचार करुन आधार क्रमांक 12 अंकी ठेवण्यात आला आहे.
आधार कार्ड क्रमांक 12 अंकी असल्यानं प्रत्येक भारतीयाला एक यूनिक नंबर देणं शक्य होतं. आधार कार्डच्या आधारे वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या सदस्यांची ओळख पटवता येते.आधार कार्ड क्रमांक 12 अंकी असल्यानं बनावटगिरी रोखण्यात मदत होते. आधार कार्डच्या अनेक सेवा ऑनलाईन असतात. आधार कार्ड यूआयडीएआयकडून जारी केले जातात.