New Year 2025 Horoscope : नवीन वर्ष 'या' राशींसाठी ठरणार 'लकी'; नोकरीत प्रमोशन अन् पगारात वाढ, धनसंपत्तीचा होईल वर्षाव
New Year Horoscope 2025 : नवीन वर्ष 2025 करिअरच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. 2025 मध्ये काही राशींसाठी चांगला योग आहे. नव्या वर्षात 4 राशींच्या करिअरला पंथ फुटती आणि त्यांना प्रमोशनसह पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्षाकडे अनेक जण अपेक्षांच्या नजरेने पाहत आहेत. नवीन वर्षासाठी लोकांनी अनेक संकल्प केले आहेत. 2024 मध्ये रखडलेली कामे नव्या वर्षात पूर्ण होतील, अशी प्रत्येकाला आशा आहे.
2024 मध्ये नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळण्याची इच्छा असणारे व्यक्ती आता 2025 कडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.
काही राशींसाठी 2025 फारच उत्तम ठरणार आहे. 4 राशींना नवीन वर्षात नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
ज्योतिषांच्या मते, नवीन वर्ष 2025 मध्ये 4 राशींच्या करिअरशी संबंधित इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. त्यांना प्रमोशनही मिळेल आणि पगारवाढही चांगली होईल. या 4 लकी राशी कोणत्या आहेत, ते जाणून घ्या.
कुंभ : 29 मार्चपर्यंत या राशीत शश राजयोग तयार होत आहे, त्याचं कारण म्हणजे याच्या लग्न घरात शनि वास करणार आहे. यानंतर शनि मीन राशीत गोचर करेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. चांगली नोकरी मिळण्याची आणि पगार होण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.
मिथुन : नवीन वर्षात या राशीमध्ये गुरु नवव्या आणि दहाव्या घरात असल्यामुळे त्यांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळेल. गुरुच्या आशीर्वादामुळे नवीन वर्षात तु्मची नोकरी प्रगती होताना दिसेल. 2025 मध्ये सध्याच्या नोकरीमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी देखील मिळू शकते. नवीन वर्षात ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न करत होता ती नोकरी तुम्हाला मिळू शकते.
मेष : या राशीच्या लोकांच्या कुंडलीत नवव्या घराचा स्वामी गुरु आहे. वर्षाच्या सुरुवातीला मेष राशीवर त्यांचा आशीर्वाद असेल. तुम्हाला प्रमोशनसह चांगल्या ठिकाणी बदली मिळू शकते. तुमची पगारवाढ अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. तुमचे उत्पन्न वाढल्याने तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करू शकता. पुढच्या वर्षी तुम्ही कुटुंबासोबत लांब सुट्टीवरही जाऊ शकता.
वृषभ : या राशीच्या लोकांना 2025 मध्ये गुरु, शनि आणि राहूची पूर्ण साथ मिळेल. यामुळे नवीन वर्षात तुम्हाला भरपूर आर्थिक नफा मिळेल. तुमचा व्यवसाय वाढेल. करिअरच्या वाढीतील तुमचे अडथळे दूर होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे. समाजात मान-सन्मान मिळेल. तुम्ही राजकारणात प्रवेश करण्याचाही विचार करू शकता
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.