Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Rohit Pawar Meet: भेट, नमस्कार, टोला अन् ढाण्या वाघ म्हणत छातीवर थाप; अजितदादा-रोहित पवारांच्या भेटीत काय घडलं?
यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त कराडमधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार, रोहित पवार, श्रीनिवास पाटील अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. यावेळी अजित पवार तेथे पोहचले होते. (Image Credit- ABP)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला. (Image Credit- ABP)
दर्शन घे दर्शन... काकाचं...असं अजित पवार रोहित पवारांना म्हणाले. यानंतर रोहित पवारांनी वाकून अजित पवारांना नमस्कार केला. (Image Credit- ABP)
यानंतर अरे ढाण्या थोडक्यात वाचलास...माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं...असं मिश्किल विधान केलं. तसेच बेस्ट ऑफ लक...म्हणत रोहित पवारांना शुभेच्छा देखील दिल्या. (Image Credit- ABP)
अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. (Image Credit- ABP)
माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती..असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही, असं रोहित पवार म्हणाले. (Image Credit- ABP)
शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं, असं रोहित पवार यांनी सांगितले. (Image Credit- ABP)