Weekly Horoscope : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या राशींच्या लोकांनी राहा सावध, साप्ताहिक राशीभविष्य
मेष राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा काही खास असणार नाही. या आठवड्यात तुमच्या वाणीच्या दुष्परिणामांमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांना वाईट वाटेल अशा गोष्टी बोलणे टाळावे. तुमच्या अनेक जवळच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. तुमची चालू असलेली अनेक कामे बिघडू शकतात. मेष राशीच्या लोकांचे आरोग्यही या आठवड्यात बिघडू शकते. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. करिअर आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमकर मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. या आठवड्यात कोणत्याही कामात घाई करणे टाळा, अन्यथा लाभाऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. कामात अनेक अडथळे येऊ शकतात. तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. व्यावसायिकांसाठीही आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो.
कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागू शकतो. हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. या राशीचे लोक जे व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांना या आठवड्यात पैशाच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्याकडून थोडासा निष्काळजीपणा देखील खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या प्रेमसंबंधांमध्येही दुरावा येऊ शकतो.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ उताराचा असणार आहे. तुम्ही ठरवलेले काम होणार नाही, त्यामुळे तुमचे मन थोडे उदास राहू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठा खर्च करावा लागू शकतो. नोकरीत, काही चुकीसाठी तुम्हाला वरिष्ठांकडून कटू शब्द ऐकावे लागू शकतात. व्यवसायात तुमचे पैसे अचानक अडकू शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यातही काही अडथळे येऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागेल. तुमच्या सर्व कामात अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळण्याचाही प्रयत्न कराल. गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही कोणतीही जोखमीची गुंतवणूक टाळावी. तुम्हाला थकवणारा प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या प्रेमसंबंधांमध्येही काही समस्या निर्माण होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)