Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, अमाप धनलाभाचे संकेत
सिंह रास (Leo) : ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीचा काळ या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. कौटुंबिक दृष्टीकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला ज्येष्ठ आणि धाकटे दोघांचंही पूर्ण सहकार्य मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आठवड्यात व्यावसायिकांना पैसे गुंतवून मोठा फायदा होऊ शकतो. परंतु, या आठवड्यात तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा कारण तुम्हाला साथीच्या आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
कुंभ रास (Aquarius) : कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सर्वोत्तम म्हणता येईल. या आठवड्यात तुम्हाला वाटेल की जीवनाची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. कोणत्याही प्रकरणाबाबत न्यायालयात वाद सुरू असेल, तर तो न्यायालयाबाहेर सर्वसंमतीने सोडवला जाऊ शकतो.
सत्ता आणि सरकारशी संबंधित इतर कामांमध्येही तुम्हाला अपेक्षित यश आणि लाभ मिळू शकतात. या राशीचे लोक जे परीक्षा स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा सामान्य राहील. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.
वृषभ रास (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप शुभ असणार आहे. या काळात नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिकांना या आठवड्यात अचानक आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नोकरदार लोकांसाठी नवीन आठवडा भरभराटीचा असेल, चांगला बोनस मिळेल.
हा आठवडा सर्वच बाबतीत अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर या काळात तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळवू शकतात. प्रियकरासोबत आनंदात वेळ घालवाल.
कर्क रास (Cancer) : ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी यशाचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर पूर्णपणे समाधानी आणि आनंदी असतील. नोकरदार लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून शक्य ती सर्व मदत मिळेल.
राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा वरदानापेक्षा कमी नाही. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही बराच काळ चिंतेत होता, त्या सर्व गोष्टी आज तुमच्या अनुकूल होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन, घर किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.
मीन रास (Pisces) : ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी खूप छान असणार आहे. कारण, या आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. किरकोळ अडथळे येतील, तरीही तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील.
या आठवड्यात तुमच्यात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर इतरांना तुमची मतं पटवून द्याल. मात्र, तुम्हाला कामाच्या ठिकाणी लहानसहान गोष्टींमध्ये पडणं टाळावं लागेल.