Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे; अनपेक्षित धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
तूळ रास : तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.
कुंभ रास : येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे.
तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अमाप यश मिळवू शकता.
या आठवड्यात तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक आहे. नोकरदार महिलांना कामात मोठं यश मिळेल.