Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, बँक बॅलन्स वाढणार
मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळू लागेल. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणीही लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी केवळ कनिष्ठच नाही तर वरिष्ठही तुमच्याशी नीट वागतील. या काळात एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजमीन, इमारती किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. आठवड्याच्या मध्यात, करिअर, व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे, जो लाभदायक ठरेल. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा चांगलं होईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope) : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर येईल, ज्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्याशी चांगले वागतील. बहुप्रतिक्षित बदली किंवा बढतीची इच्छा पूर्ण होऊ शकते.
जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते. जर तुम्ही दीर्घ काळापासून मालमत्ता खरेदी-विक्रीची योजना आखत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope) : सिंह राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल आणि सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. मित्र तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मिटतील.
प्रॉपर्टी आणि कमिशनची कामं करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहील. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope) : तूळ राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप शुभ असणार आहे. हा आठवडा सुरू होताच तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. या काळात नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगली संधी मिळू शकते.
या आठवड्यात कर्ज, रोग आणि शत्रूंवर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आठवड्याच्या मध्यात धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित जे काही प्रवास तुम्ही कराल ते तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope) : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा अधिक शुभ आणि लाभदायक असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक काही मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं, परंतु तुम्ही त्या आव्हानाचा धैर्याने सामना कराल आणि सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल.
तसेच, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या हितचिंतकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असणार आहे. नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील आणि संचित संपत्तीत वाढ होईल. तुम्हाला कोणत्याही योजनेतील जुन्या गुंतवणुकीतून मोठे फायदे मिळू शकतात.