नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करून आपल्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. शोभितानं या समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशोभिता धुलिपाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. आता काहीच दिवसांत ती साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या घराची सून होणार आहे. या जोडप्याचा हळदी समारंभ काल म्हणजेच, 29 नोव्हेंबर रोजी पार पडला.
शोभितानं हळदीचे आणि मंगलस्ना विधीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शोभिता पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, त्यासोबत तिनं ऑफ शोल्डर ब्लाऊज वेअर केला होता.
नागा चैतन्यची होणारी नवरी शोभितानं आपल्या हळदी समारंभासाठी ट्रेडिशनल लूक कॅरी केला होता. त्यासोबत तिनं गोल्ड ज्वेलरी मॅच केली होती. तिनं नाकात नथही घातली होती.
दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभुता धुलिपाला पुढच्या महिन्यात म्हणजेत, 4 डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. दोघांचं लग्न हैदराबादमध्ये होणार आहे.
अभिनेत्रीनं लेटेस्ट फोटोंमध्ये हळदी समारंभ सुरू होण्यापूर्वी फोटोशूट केलं आहे.