Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका कचऱ्याचा डबा; घरातील लक्ष्मी जाईल निघून, गरिबीला मिळेल आमंत्रण
वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आलं आहे, ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे घरातील कचऱ्याचा डबा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकचऱ्याचा डबा, म्हणजेच डस्टबिन चुकीच्या जागी ठेवला तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात डस्टबिन योग्य दिशेला ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो.
वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होतो. आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, आजार तुमची पाठ सोडत नाहीत. काही ना काही समस्या घरात कायम राहतात, त्यामुळे घरात कचऱ्याचा डबा योग्य दिशेला ठेवणं गरजेचं आहे.
या दिशेला डस्टबिन ठेवू नका : वास्तुशास्त्रानुसार, डस्टबिन कधीही उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला ठेवू नये. या दिशेला डस्टबिन ठेवल्यामुळे घरात गरिबी येते. शास्त्रात ईशान्य दिशेला देवतांची दिशा मानण्यात आली आहे, त्यामुळे या दिशेला डस्टबिन ठेवणं अशुभ आहे.
वास्तूनुसार, ज्या घरामध्ये ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवला जातो, त्या घरातील सदस्य नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात.
डस्टबिन पूर्व, दक्षिण-पूर्व (आग्नेय) आणि उत्तर दिशेला ठेवणं देखील अशुभ आहे. या दिशेला डस्टबिन ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती बिघडू लागते.
डस्टबिन नैऋत्य दिशेला देखील ठेवू नये, ही पूर्वजांची आणि संपत्तीची दिशा मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार येथे डस्टबिन ठेवल्याने पितृदोष निर्माण होतो आणि धनहानी होते.
या दिशेला डस्टबिन ठेवा : वास्तुशास्त्रानुसार, डस्टबिन कधीही घराबाहेर ठेवू नये. वास्तुशास्त्रात डस्टबिनसाठी उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशा शुभ मानली जाते. ही दिशा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला डस्टबिन ठेवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम उद्भवत नाही.
वायव्य दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील धन-समृद्धी वाढते. डस्टबिन नेहमी झाकून ठेवा. डस्टबिन उघडा ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
याशिवाय डस्टबिन नियमितपणे स्वच्छ करणं देखील तितकंच आवश्यक आहे.