Diwali 2023: दिवाळीच्या आधी घरातून बाहेर काढा 'या' वस्तू; दूर होईल नकारात्मकता, नांदेल सुख-समृद्धी
हिंदू धर्मात दिवाळी हा सण अत्यंत शुभ मानला जातो. दिवाळीपूर्वी प्रत्येकाची घरं रंगवली जातात आणि प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. साफसफाई करताना घरातील काही वस्तू काढून टाकणं खूप महत्वाचं आहे. कारण या नकारात्मक गोष्टी घरात ठेवल्याने नेहमी पैशाची कमतरता भासते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंद पडलेलं घड्याळ: वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ ठेवणं फारच अशुभ आहे. याचं कारण घड्याळ हे सुख आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवते, असं मानलं जातं. दिवाळीची स्वच्छता करताना या वस्तू फेकून द्या.
तुटलेल्या काचा: वास्तुशास्त्रानुसार, तुटलेला आरसा किंवा काच चुकूनही घरात ठेवू नये. याचा घरावर खूप अशुभ प्रभाव पडतो. तुमच्या घराच्या खिडकी, दार, आरसा इत्यादीची काच तुटली असेल किंवा काचेचं भांडं तुटलं असेल, तर ते दिवाळीपूर्वी फेकून द्या. घराच्या खिडकीच्या काचा तुटल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते.
जुने दिवे: दिवाळीला गेल्या वर्षीचे दिवे लावू नका. प्रत्येक वर्षी नवीन दिवे खरेदी करून लावा. जुने दिवे विसर्जित करा.
जुने फाटलेले कपडे: दिवाळीत नव्या कपड्यांची खरेदी केली जाते. आपल्याकडे कपाटभरुन कपडे जमतात, बारमाही शॉपिंग सुरू असली तरी आपण जुने कपडे टाकून देत नाही. जुने, फाटके कपडे जमवून ठेवणं हे दुर्भाग्याचं लक्ष असतं. त्यामुळे दिवाळीआधी ते फेकून दिले पाहिजे, तरच घरात समृद्धी नांदते.
तुटलेल्या चपला: तुटलेल्या चपला घरात ठेवल्याने घरात लक्ष्मी येत नाही, असं मानलं जातं. दिवाळीच्या आधी असे बूट आणि चपला फेकून दिल्या पाहिजे.
तुटलेली भांडी: तुटलेली भांडी वापरणं अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा घरात गरिबी वास्तव्य करू लागते. त्यामुळे या दिवाळीपूर्वी घरातील तुटलेली किंवा तढे गेलेली भांडी फेकून द्या. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली किंवा तढे गेलेली भांडी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते.
तुटलेल्या कोणत्याही गोष्टी: घरामध्ये ठेवलेली जुनी आणि तुटलेली भांडी असो किंवा खेळणी, सजावटीच्या वस्तू, कपडे, चप्पल आणि फाटलेल्या चादरी त्वरीत घरातून फेकून द्या. तरच घरात लक्ष्मी वास करेल.
खराब झालेले कुलूप: जेव्हा आपल्यासोबत एखादी चांगली घटना घडते, त्यावेळी भाग्य उजळलं किंवा नशिबाचं टाळं उघडलं, असं आपण म्हणतो. परंतु बिघडलेलं कुलूप घरात ठेवल्याने आपली प्रगती थांबते, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यामुळे असं कुलूप घरात ठेवू नये.
देवीदेवतांचे जुने किंवा खराब झालेले फोटो: देवीदेवतांचे खराब झालेले फोटो विसर्जित केले पाहिजे, कारण अशा फोटो-मूर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते, म्हणून आधी असे फोटो समुद्रात किंवा तलावात विसर्जित केले पाहिजे.