जगन्नाथ पुरीच्या मंदिराची 'ही' आहेत रहस्य
मंदिरावरील सुदर्शन चक्र - जगन्नाथ पुरीच्या मंदिराची उंची 214 फूट आहे. या मंदिरावरील सुदर्शन चक्राबाबत बरेच कुतूहल आहे.हे सुदर्शन चक्र कुुठूनही पाहिले तरी ते समोरच असल्याचे दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मंदिराच्या घुमटाची सावली देखील कधीच दिसत नाही.
समुद्राच्या लाटांचा आवाज - या मंदिराबाबतची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराजवळच समुद्र आहे. पण त्या समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आतमध्ये एकू येत नाही.
पण जसे तुम्ही मंदिराच्या बाहेर जाल तुम्हाला मंदिराच्या लाटांचा आवाज पुन्हा येऊ लागेल.
इतकेच नव्हे तर सामान्यपणे दिवसाच्या वेळी वारा हा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो तर संध्याकाळी वारा हा जमिनीपासून समुद्राकडे वाहतो. पण पुरीमध्ये ही परिस्थिती कायम उलटी असते.
मंदिरातील प्रसाद कधीही वाया जात नाही - दरोरज लक्षावधी भाविक जगन्नाथाच्या मंदिराला भेट देत असतात. लाखो भाविकांसाठी तेवढ्याच प्रमाणात इथे प्रसाद बनवला जाते. पण त्यातलं थोडही अन्न कधीही वाया जात नाही.
प्रसाद सात भांड्यात केला जातो. ही सात भांडी एकावर एक अशी चुलीवर ठेवली जातात. पण त्याच्यातील सर्वात वरच्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो आणि सगळ्यात शेवटी खाली ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद शिजतो.
दर बारा वर्षांनी नवलेपन - जगन्नाथ पुरीच्या मुर्तींना दर बारा वर्षांनी नवलेपन केले जाते. नवलेपनाचा प्राथमिक विधी झाल्यानंतर मंदिरातील पुजारी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाचा उत्तर विधी जर कोणी पाहिला तर त्याचा मृत्यू होतो अशी इथली मान्यता आहे.
तसेच नवलेपनाच्या विधीदरम्यान देवाच्या हृदयाची धडधड ऐकू येते असे देखील म्हटले जाते.