Surya Gochar 2024 : धनु राशीत सूर्याचं संक्रमण 'या' 3 राशींसाठी धोकादायक; करावा लागणार आर्थिक तंगीचा सामना
ग्रहांचा राजा सूर्य 15 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर, 30 दिवसांपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. त्यानंतर 14 जानेवारी 2025 रोजी सूर्याचं संक्रमण मकर राशीत होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनु राशीचा स्वामी गुरु आणि सूर्य-गुरुमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. पण, सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा हा काळ शुभ कार्यांसाठी शुभ नाही.
जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याच्या तेजाने गुरुच्या शुभ्रतेचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे खरमासात 30 दिवसांपर्यंत लग्न समारंभ, मुंज, गृहप्रवेशसारखी शुभ कार्य करणं शुभ मानलं जात नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार, खरमास लागताच अनेक राशीच्या लोकांना अशुभ परिणाम सहन करावे लागतात. विशेषत: ज्यांच्या कुंडलीत गुरुची स्थिती कमजोर असते अशा लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते.
सूर्याने संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अशा वेळी तुम्ही वाहन चालवताना काळजी घ्यावी. तसेच, कोणतीही नवीन डील करु नये.
सूर्य कन्या राशीच्या बाराव्या चरणात असणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या धनखर्चात वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मकर राशीच्या कुंडलीत आठव्या चरणात सूर्याची स्थिती असल्यामुळे पुढच्या 30 दिवसांपर्यंत हा काळ आव्हानात्मक असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)